पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident |बंगलुरु – मुंबई महामार्गा(Bangalore – Mumbai Highway)वरील नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आज सकाळी पुन्हा एकदा विचित्र अपघात झाला असून त्यात ८ वाहनांचे नुकसान झाले आहे.
Pune Navale Bridge Accident | accident of truck on navale bridge
ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणार्या ८ वाहनांना धडक दिली. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सातार्याकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रक आज सकाळी नवले पुल आणि हॉटेल विश्वाससमोर आला होता. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणार्या ४ चारचाकी व ३ रिक्षांना जोरात धडक दिली. त्यातील काही जण जखमी झाले आहेत. या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
web title: Pune Navale Bridge Accident | Another major accident on Navale bridge in Pune; Damage to 8 vehicles due to loss of control of the truck driver
Pune Crime News | कोंढव्यात दुचाकीस्वार 10-12 जणांच्या टोळक्याचा राडा, तरूणाला बेदम मारहाण
Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी (व्हिडिओ)
Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण
MPSC | निवड झालेले अधिकारी उतरले रस्त्यावर, पुण्यात चक्काजाम आंदोलन
Monsoon Update । राज्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु, चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा