Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक मार्गावर भीषण अपघात, 10 मेंढ्या जागीच ठार

संगमनेर : बहुजननामा ऑनलाईन – Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) डोळासणे गावाच्या परिसरात पिकअप व ट्रकची (Truck) जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये १० मेंढ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा होत्या व तो ट्रक संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता.
शनिवारी पहाटे डोळासणे (Dolasane) गावच्या हद्दीमध्ये असताना नाशिक (Nashik) येथील मनमाड
(Manmad) जिल्हातील मेंढ्या घेऊन जाणाऱ्या पिकअपची (Pick- Up) जोरदार धडक झाली.
पिकअप चालक समीर शेखचे (Sameer Shaikh) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरील विटांच्या ट्रकला
त्याने पाठीमागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात पिकअपमधील १० मेंढ्या जागेवरच चेंगरुन ठार झाल्या असून पिकअपच्या पुढील
भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअप चालक समिर शेख
आणि रामा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
Web Title : Pune Nashik Highway Accident | Terrible accident on Pune-Nashik route, 10 sheep killed on the spot
हे देखील वाचा :
Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल
Comments are closed.