पुणे : बहुजननामा ऑनलाईन – डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानात दारू पित असताना मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात भिंतीवर लावलेला फायर सेफ्टीचा लाल डब्बा घालून खून (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजन (वय 35) असे खून (murder) झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजन आणि त्याचा मित्र कर्वे रस्त्यावरील गरवारे प्रशाला शाळेच्या मैदानात मध्यरात्री दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी दारू पित असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादातून राजन याच्या डोक्यात डब्बा घालून खून केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर तपासाला सुरुवात केली आहे.
कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या
6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारची मोठी भेट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या
DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक
‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पद्धतीने कराव बचाव; जाणून घ्या
आज मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन, 5 राशींना अडचणी, रहा सावध; इतरांसाठी असा आहे बुधवार