• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
file photo

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सध्या पुणे महापालिका कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक एक हजार कोटींनी फुगविण्यात आले आहे. उत्पन्नाचा सर्वाधिक भार मिळकत कर विभागावर टाकण्यात आला आहे. यावर्षी आरोग्य विषयक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पीपीपी मॉडेलद्वारे रस्ते विकसित करणे, डीपी रस्त्यांचे विकसन करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला ७ हजार ६४९ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने तब्बल ७२० कोटी रुपयांची वाढ केली आहे.

गेल्या वर्षी (सन २०२०-२१) ७ हजार ३९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. रासने यांनी ऑनलाईन सभेद्वारे मांडलेल्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकामध्ये प्रभावी महसूल वाढ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विषयक खर्चांवर लक्ष देण्यात आले असून वैद्यकीय महाविद्यालयासाठी १४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रक्तपेढी उभारणे, नवीन कार्डीअ‍ॅक रुग्णवाहिका घेणे, अपघात विमा योजना यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच मध्यवर्ती भागासह शहराच्या कोणत्याही भागात १० रुपयांमध्ये दिवसभरात वातानुकुलीत बस प्रवास योजना तसेच पाच रुपयात प्रवास योजनेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. गतिमान वाहतुकीसाठी मेट्रो, स्वारगेट-कात्रज बीआरटी, एचसीएमटीआर, नगर रस्त्यावर उड्डाणपूल उभारणे, डीपी रस्ते आणि पूल खासगी सहभागातून विकसीत करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच शिवणे-खराडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बालभारती पौड फाटा रस्ता या प्रलंबित रस्त्यांसाठीही तरतूद देण्यात आली आहे.

खासगी सहभागातून महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, सारसबाग आणि पं. नेहरु स्टेडियम परिसर, मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय, के. के. मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महसुल वाढीची आवश्यकता आहे. त्याकरिता मिळकतकराची साडेचार हजार कोटींची थकबाकी वसुल करण्यावर भर देण्यात येणार आहे. कराच्या कक्षेत न आलेल्या मिळकती शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणले जाणार असून मिळकत कर आकारणीतील गळती थांबविण्यात येणार असल्याचे रासने म्हणाले. यासोबतच पाणीपट्टीची थकबाकीही वसुल केली जाणार आहे. समान पाणी पुरवठा योजना, भामा-आसखेड, नदी सुधारणा, समाविष्ट ११ गावांमध्ये मलवाहिन्या विकसित करणे, मुळा-मुठा नदीकाठ विकसन, जांभुळवाडी तलावाचा पीपीपी तत्वावर पुनर्विकास यालाही अंदाजपत्रकात स्थान देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी छोटे छोटे प्रक्रिया प्रकल्प उभारणे, पर्यावरण संवर्धन याविषयीही तरतूद देण्यात आली आहे.

पालिकेच्या उत्पन्नाच्या इतर पयार्यामधून प्रशासनाने ८५४ कोटी उत्पन्न अपेक्षित धरले होते. यामध्ये स्थायी समितीने ५० कोटींची वाढ केली आहे. तर, बांधकाम शुल्कामध्ये २०० कोटींनी वाढ करण्यात आली आहे. मिळकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची वाढ गृहीत धरण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी नियमित कर भरणा-या नागरिकांना मिळकतकरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. पालिका प्रशासनाने २०२१-२२ च्या अंदाजपत्रकामध्ये गृहीत धरलेल्या उत्पन्नामध्ये स्थायी समितीने भरमसाट वाढ केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही सन २०२१-२२ चे तब्बल ८ हजार ३७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags: breakingBudgetCommissioner Vikram KumarCoronaDeputy Mayor Saraswati ShendgeHemant RasneKatraj Kondhwa Roadlatest pune newslatest pune news in marathiMayor Murlidhar Moholppp modelPune Municipal Corporationpune municipal corporationsPune NewsPune News in MarathiSarasbaghShivne Kharadi RoadTulshibaghआयुक्त विक्रम कुमारउपमहापौर सरस्वती शेंडगेकात्रज कोंढवा रस्ताकोरोनातुळशीबागपीपीपी मॉडेलपुणे मराठी बातम्यापुणे महापालिकामहापौर मुरलीधर मोहोळशिवणे खराडी रस्तासारसबागहेमंत रासने
Previous Post

फडणवीसांनी सरकारला फटकारले; म्हणाले – ‘हे तर चर्चेपासून पळ काढणारे पळपुटे सरकार’

Next Post

पूजाची आई मंदोधरी आणि वडिल लहू चव्हाण यांच्यावर आजी शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला ‘हा’ मोठा गोप्यस्फोट (व्हिडीओ)

Next Post
Puja Chavan

पूजाची आई मंदोधरी आणि वडिल लहू चव्हाण यांच्यावर आजी शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला 'हा' मोठा गोप्यस्फोट (व्हिडीओ)

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
ताज्या बातम्या

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

March 1, 2021
0

...

Read more

Pune : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर जयंती घरात साजरी करून पुस्तक मिळवा

2 days ago

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दुसऱ्या मुलीवर बळजबरीचा प्रयत्न

3 days ago

Facebook नंतर आता LinkedIn च्या 500 मिलियन युजर्सचा डाटा ‘लिक’, पत्ता अन् फोननंबरचा समावेश

3 days ago

गोचरमुळे ‘या’ 7 राशींना होणार जोरदार लाभ, पैसा येईल, इतरांसाठी असा आहे मंगळवार

6 days ago

Video कॉलिंगच्या माध्यमातून महिलेने कपडे काढले अन्..

2 days ago

दीपिका सिंग चा शॉर्ट ड्रेस ठरला तिच्यासाठी डोकेदुखी; झाली Oops Moment ची शिकार

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat