पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Municipal Corporation-PMC | केंद्र सरकारच्या (Central Government) निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation-PMC) आजपासून (शुक्रवार) 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमधील 68 दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सीन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) दोन्ही लसींचे डोस उपलब्ध केले आहेत. या ठिकाणी शहरातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस (Corona Preventive Vaccine) मोफत दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांसह गेल्या 3 महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग न झालेले नागरिक प्रतिबंधात्मक डोससाठी पात्र राहणार आहेत. पात्र नागरिकांनी घरानजदीक महानगरपालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन मोफत लस घ्यावी, असं आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation-PMC)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर (Dr. Suryakant Deokar) म्हणाले, “नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून अथवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन नोंदणी करून देखील लस घेता येईल. निश्चित कोट्यानुसार या लसींचे डोस उपलब्ध होतील. ऑनलाइन बुकिंगसाठीचे स्लॉट्स सकाळी 8 वाजता खुले होतील.”
Web Title :- Pune Municipal Corporation-PMC | corona preventive dose in 68 hospitals from pune municipal corporation pmc
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे