पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दुचाकीस्वार चोरट्याची शक्कल पाहता पुणेकरांना हसाव की रडावं असेच दिसत असून, दोन चोरटयांनी दुचाकीवर येत “तंबाखू आहे का, अशी विचारणा करत तरुणांचे 2 मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कोंढवा भागात भरदुपारी घडली आहे.
याप्रकरणी महंमद सद्दाम हुसेन (वय 28) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरटयांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या आठवड्यात दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास हंडेवाडी रोडने पायी चालत जात होते. त्यांचा मित्रही होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीस्वार आले. त्यांनीजवळ येऊन फिर्यादी यांना तंबाखु आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर फिर्यादी यांना दमदाटी करत त्यांचा व त्यांच्या मित्राचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.