पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune MHADA Lottery 2022 | पुणे शहर आणि परिसरात म्हाडाच्या पाच हजार 68 घरांची सोडत निघणार आहे. याबाबत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune Maharashtra Housing and Area Development Board) घरांची सोडत काढली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 68 सदनिकांच्या विक्रीकरता पुणे म्हाडातर्फे (Pune MHADA) ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यामुळे पुणेकरांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. (Pune MHADA Lottery 2022)
29 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात या लॉटरीतील सदनिकांच्या वितरणासाठीच्या अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. लॉटरीची नियमावली, मार्गदर्शक सूचना इत्यादीची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://lottery.mhada.gov.in वर जाऊन इच्छूक अर्जदार पाहू शकतात असं सांगण्यात आलं आहे. (Pune MHADA Lottery 2022)
काल (गुरूवारी) 9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला (Online Application Registration) सुरुवात झाली असून इथून पुढे एक महिना म्हणजेच 9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. तसेच, 10 जून, 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज करता येईल. 10 जुलै, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर केले जाणार आहे.
ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती 11 जुलै, 2022 रात्री 11.59 पर्यंत केली जाणार आहे. 12 जुलै, 2022 रोजी अर्जदारांना बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT च्या माध्यमातून अनामत रक्कम भरता येणार आहे. 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण 1945 सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) हद्दीमध्ये ५७५ घरे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation-PCMC) हद्दीमध्ये 1370 घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत 279 घरे, प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील 2 हजार 675 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून दिल्या आहेत.
Web Title :- Pune MHADA Lottery 2022 | pune mhada has started online application registration know about draw and application process for sale for flats
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर
- Pune PMC News | पुणे महापालिका प्रशासनाने आजपासून TDR ची प्रक्रिया आणखी सोपी केली; विलंब टाळण्यासाठी टप्पा क्र. 2 मध्ये आयुक्त व स्थायी समितीचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे
- Pune Crime | ‘आम्हीच इथले भाई, नादाला लागला तर खल्लास करु’, वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना खुन्नस दिल्याने टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार