Pune Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, दीपक केसरकर यांची माहिती

Pune Metro | Shivaji Nagar to Hinjewadi Metro project will be completed on priority informed by Deepak Kesarkar

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Pune Metro | पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) शेवटच्या दिवशी लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवाजी नगर (Shivaji Nagar) ते हिंजवडी (Hinjewadi) मेट्रो प्रकल्प (Pune Metro) प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची माहिती दिली. पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर (Pune Traffic Jam) तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे (Pune Metro) प्रकल्पाची 23.3 किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प (Metro Rail Project) कालावधी 40 महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे.

 

या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग (No Parking), नो हॉल्टिंग झोन करणे (No Halting Zoning), सायकल ट्रॅक (Cycle Track) आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.
पुणे मुंबई महामार्गावरील (Pune Mumbai Highway) चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल,
असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी विचारलेल्या उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
या चर्चेत सिध्दार्थ शिरोळे (Siddharth Shirole), राहुल कुल (Rahul Kul), भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

 

Web Title :- Pune Metro | Shivaji Nagar to Hinjewadi Metro project will be completed on priority informed by Deepak Kesarkar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जुन्या भांडणावरुन महिलेचा खून, पुणे जिल्ह्यातील कळसमधील घटना

Maharashtra IPS Promotion | अप्पर महासंचालक (ADG) संजय कुमार आणि प्रज्ञा सरवदे यांची महासंचालकपदी (DG) पदोन्नती

Pune Crime | 60 वर्षाच्या ‘तरूणा’ नं केले शेजारणीला प्रपोज, अश्लील गाणी म्हणून विनयभंग करणाऱ्या शौकिनावर FIR