बहुजननामा ऑनलाईन – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडे पाहून सहप्रवाशाने हस्तमैथून केल्याचा घृणास्पद प्रकार पिंपरी- चिंचवड शहरात समोर आला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक केली आहे.
सोहेब इक्बाल कुरेशी (वय 30) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोरवाडी, पिंपरी येथून शेअरिंग रिक्षातून आपल्या लहान मुलाला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रिक्षात बसलेली व्यक्ती आपल्याकडे बघून अश्लील कृत्य करत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर रिक्षा वायसीएम रुग्णालयाजवळ पोहोचताच महिला रिक्षातून उतरली आणि तिने रुग्णालयाच्या आवारातच असलेल्या पोलिस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.