पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Lodha Belmondo Project | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या प्रकल्पातील 2800 फ्लॅटधारकांची विकसक व राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांच्या लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. (Macrotech Developers Ltd.) या कंपनीने फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप फ्लॅटधारकांनी केला आहे. या विरोधात 22 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा फ्लॅट धारकांनी दिला आहे. तसेच ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात लढण्याचा निर्णय बेलमोंडो प्रकल्पातील (Pune Lodha Belmondo Project) ग्राहकांनी घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) अॅड. श्रीराम पिंगळे (Adv. Shri Ram Pingle) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे येथील लोडा बेलमोंडो प्रकल्पातील (Pune Lodha Belmondo Project) 2800 हून अधिक फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक व विश्वासघात केला गेला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता करारनामा (Agreement) योग्य प्रक्रियेने केला नाही. मेन्टेन्सच्या नावाखाली अवाजवी रक्कम वसूल केली जात आहे, बांधकामाची गुणवत्ता राखलेली नाही, सोसायटीची स्थापना केलेली नाही, कन्व्हेन्स डीड (Conveyance Deed) करुन दिले नाही, ग्राहकांनी बनवलेली व नोंदणी केलेली सोसायटी व फेडरेशनची नोंदणी रद्द करायला लावली, वारंवार मागणी करुन देखील मेन्टन्सचा हिशोब दिला नाही, असे अनेक प्रकार या प्रकल्पात सुरु असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
कॅबिनेट मंत्री व विकसक लोढा यांनी मोफा (MOFA) व रेरा कायद्याची (Rera Act) पयमल्ली केली आहे. करारनाम्यात दिलेल्या तारखांना फ्लॅट दिलेला नाही. प्रकल्प व इमारत पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यात सोसायटी स्थापन करुन कन्व्हेन्स करुन देणे अपेक्षित असताना विकसक व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मनमानी केली जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच इन्शुरन्स पॉलिसीच्या (Insurance Policy) कॉपी वारंवार मागूनही त्या दिल्या नाहीत. स्वत:च्या लोनचा इन्शुरन्स खर्च सोसायटीच्या खात्यातून केला जात असून अद्याप लेखापरीक्षण केले नसल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रकल्पातील ग्राहकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता,
त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून जाणीवपर्वक त्रास दिला जात आहे.
संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन व राजकारणी व संबंधीत शासकीय यंत्रणा देखील
कॅबिनेट मंत्री व विकसक मंगलप्रभात लोढा यांच्या बाजूने काम करत असून शासकीय यंत्रणांचा होत
असलेला गैरवापर बंद करावा अशी मागणी फ्लॅट खरेदीदारांनी केली आहे.
Web Title :- Pune Lodha Belmondo Project | Lodha Group’s Macrotech Developers Ltd.Allegation that hundreds of flat holders were cheated by the company; Warning of agitation on January 22
हे देखील वाचा :