पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पार्किंग करण्यात आलेल्या ५ दुचाकींची अल्पवयीन मुलाने तोडफोड केल्याची घटना खडकी परिसरात घडली. तर याचा जाब विचारणाऱ्यास देखील दांडक्याने मारहाण केली.
याप्रकरणी सिद्धार्थ मोते सरदार (वय ३०, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात फिर्यादी याांनी
बुद्धविहारालगत दुचाकी वाहने उभी केली होती. त्यावेळी तेथे आलेल्या अल्पवयीन मुलाने अचानकपणे दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ५ दुचाकींचे नुकसान झाले आहे. परिसरातील एकाने अल्पवयीन मुलाला दुचाकी तोडफोडीचे कारण विचारले असता, त्याने संबंधिताला लाकडाने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार संजय आढारी तपास करीत आहेत.