पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहरात वर्षानुवर्ष ‘कडक’ आव्वाज असणाऱ्या खडक पोलीस ठाण्यात रविवारी रात्री भलताच ‘राडा’ झाला असून, शहरभर या राड्याची चर्चा सुरू आहे. एका अधिकाऱ्याशी घनिष्ठ मैत्रीचे असणाऱ्या ‘त्या’ काळाकोट घालून आलेल्या ‘डॉक्टर’ महिलेने पोलिस ठाण्याच्या आवारातच पोलिस अधिकार्याच्या कानशिलात मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे ‘कडक’ असणारे खडक पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.
त्याचे झाले असे संबंधित अधिकारी हे सहाय्यक निरीक्षक असून त्यांची नुकतीच खडक पोलीस ठाण्यातून इतरत्र बदली झाली आहे. दरम्यान, त्यांचे आणि एका महिलेशी मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत. मात्र काही कारणावरून त्यांचे वाद झाले होते. राग अनावर झाल्यानंतर ही महिला थेट पोलीस ठाण्यात आली. ठाण्याच्या आवारातच त्यांचे वाद झाले आणि त्याचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. महिलेने थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कानशिलात मारली आणि अचानक गोंधळ उडाला. अचानकपणे झालेल्या या गोंधळामुळे पोलीस ठाण्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्याना देखील काही कळेनासे झाले. यावेळी संबंधीत अधिकाऱ्याने ‘खाकी’ घातली होती. मात्र, धाडस दाखवत एका महिला कर्मचाऱ्यांने ‘काळाकोट’ घालणाऱ्या महिलेचा चांगलाच ‘रंग’ उतरवला. महिला कर्मचाऱ्यांने या महिलेला खाकीची पावर दाखवत चोप दिला. त्यानंतर कुठे सर्वांना ‘समाधान’ वाटले. कारण भर ठाण्यात एक महिला खाकी वर्दीवर असणार्या अधिकाऱ्यावर हात उचलते आणि तरीही कोणी काही करत नाही, असे वाटत होते. पण या सर्व प्रकारची चांगलीच चर्चा शहरात सुरू आहे.
सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यावर थेट पोलिस ठाण्यात येऊन हात उचलण्यापत लोकांची हिम्मत होत असेल तर मग काय ? मात्र, याबाबत संबंधित वरिष्ठांना कल्पना असणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्यात येऊन वर्दी परिधान केलेल्या सहाय्यक निरीक्षकाच्या कानशिलात भडकावण्याची हिम्मतच कशी होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सध्या आहे.