Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या दृष्टीने माजी खासदार संजय काकडे यांचा ‘उपयोग’ संपला? कसब्यातील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून साधे निमंत्रणही नाही
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी खासदार आणि पक्षाचे उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनाच निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा असलेल्या काकडे यांची खासदारकी संपुष्टात आल्यानंतर त्यांचा ‘ उपयोग ‘ संपल्याच्या भावनेतूनच त्यांना पक्षातून साईड ट्रॅकवर टाकल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने काकडे समर्थक नाराज झाले आहेत. (Pune Kasba Peth Bypoll Election)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे (Sanjay Nana Kakade) यांचा फोटो नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही. आणि विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचेही नाव त्या मेसेज मध्ये नाही. भाजपकडून या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. गिरीश बापट आजारी असल्याने ते अनुपस्थित असणे समजू शकते परंतु, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)
वास्तविक कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे.
काकडे यांचा जन्म घोरपडी पेठेतला आहे. वयाच्या 22 वर्षांपर्यंत काकडे यांचे घोरपडी पेठेत वास्तव्य होते.
त्यामुळं घोरपडी पेठेबरोबरच 7 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये
काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील
काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो.
गिरीश बापट हे विद्यमान खासदार आहेत. शिवाय त्यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदार संघाचे
प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळं त्यांना देखील मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.
असे असून देखील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले असा
प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.
संजय काकडे आणि गिरीश बापट यांना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चादेखील होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Ex-MP Sanjay Kakade’s ‘use’ is over for BJP? There is not even a simple invitation from the party to fill the application form of the candidate in the town
हे देखील वाचा :
Dhule Crime | धुळे हादरलं! पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून पतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
Comments are closed.