पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune HSC Students Suicide | आज (बुधवार) दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल (Online Result) जाहिर झाला. यानंतर पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली. बारावीत नापास (Fail) झालेल्या एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या (Pune HSC Students Suicide) केली. निखील लक्ष्मण नाईक Nikhil Laxman Naik (वय-19 रा. श्रावणधारा वसाहत) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निखील हा गरवारे महाविद्यालयात (Garware College) वाणिज्य (Commerce) शाखेत शिक्षण घेत होता. आज निकाल लागणार असल्याने तो निकालाबाबत खुपच उत्सुक होता.
दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजताच तो इमारतीच्या वर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. खाली उभे असलेल्या शेखर लोणारे Shekhar Lonare (वय-30) यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निखल याला क्रिकेटची आवड होती. तसेच बॉडी बनवण्यसाठी त्याने जीम सुरु केली होती. तो शांत स्वभावाचा होता. त्याचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
निखिलच्या जाण्याने श्रावणधारा वसाहतीमधील नागरिकांनी दु:ख व्यक्त केले. सुरुवातीला झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे. कष्टकरी कुटूंबातील आशेचा किरण असलेल्या तरुण मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title :- Pune HSC Students Suicide | after result 12th failed students suicide in kothrud of pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या
- Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल
- झहीर इक्बाल सोबत लग्नाच्या बातम्यांवर Sonakshi Sinha ने सोडले मौन, म्हणाली – ‘रोका, मेहंदी सर्व…’
- Ekta Kapoor | चाळीशी पार केल्यानंतरही एकता कपूरनं केलं नाही लग्न; म्हणाली – ‘वडिलांच्या एका अटीमुळे…’
- Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी