Pune Hilltop Hillslope Reservation | पुण्यातील हिलटॉप हिलस्लोप आरक्षण, 6 मीटर, 9 मीटर रस्ते आणि मिळकत कराबाबत 22 जानेवारीला मंत्रालयात होणार चर्चा

Third Municipal Corporation in Pune

पुणे : Pune Hilltop Hillslope Reservation | नगरविकास राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुणे महापालिकेमध्ये (Pune Municipal Corporation – PMC) आठवड्याभरापुर्व पहिलीच बैठक घेणार्‍या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी २२ जानेवारीला नगरविकास मंत्रालयात पुण्याशी संबधित विषयांवर उच्च स्तरीय अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महापालिकेशी संबधित विषयांवर मागील आठवड्यात पुणे महापालिकेमध्ये अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीतील मुद्दयांवरच २२ जानेवारीला दुपारी तीन वाजता मंत्रालयात मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने मिळकत कर, पीएमआरडीएकडून महापालिकेला येणे असलेला निधी, ६ मिटर आणि ९ मिटर रस्त्यांबाबत, हिलटॉप हिलस्लोप आरक्षणाबाबत आणि मेट्रोशी संबधित प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे.

 या बैठकीला नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, पुणे महापालिकेचे आयुक्त, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, पीएमआरडीएचे आयुक्त व संबधित अधिकारी उपस्थित राहाणार असल्याचे नगरविकास विभागाने जाहिर केलेल्या बैठकीच्या कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.