पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गुंड गजानन मारणेच्या रॅली प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयानं जामीन दिला आहे. 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात काकडे यांना अटक करण्यात आली होती. काकडे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून रिमांड रिपोर्टव्दारे काही दावे करण्यात आले होते मात्र न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे.
कुख्यात गुंडे गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सूटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी जंगी रॅली काढली होती. त्या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तात्काळ व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हयाच्या चौकशीसाठी काकडे यांना गुन्हे शाखेत देखील बोलावण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी काकडे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून रिमांड रिपोर्टव्दारे त्यांच्याकडे तपास करावयाचा असल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे.