मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या सर्व मुली फ्लोरा कँपसमध्ये (Flora Campus) वास्तव्यास असून त्यांची जेवणाची स्वतंत्र व्यवस्था आहे. रविवारी (दि.26) रात्री जेवण केल्यानंतर सोमवारी (दि.27) सकाळी 4 ते 5 मुलींना पोटदुखीचा आणि उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. मात्र त्याकडे त्यांनी गांभिर्याने पाहिले नाही. सोमवारी रात्रीपर्यंत अनेक मुलींना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.28) उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भोरच्या ग्रामीण रुग्णालयात 22 मुली उपचारासाठी दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सध्या विषबाधा झालेल्या सर्व मुलींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर प्रकृती खालावलेल्या मुलींना तातडीने पुण्यातील (Pune News) ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
Web Title :- Pune Food Poisoning Navguru Institute | Food poisoning navguru institute 28 student bhor
Jio Best Plan | जिओ देतंय कमी किंमतीत दररोज 1.5 GB Data अन् अनलिमिटेड कॉलिंग; जाणून घ्या प्लॅन
MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली