पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire | कॅन्टोमेंट भागात एमजीरोड वंडरलँड बिल्डिंगच्या (MG Road Wonderland Building) समोरील इमारतीचे बेसमेंटमधील साहित्याला आग लागली असल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला आहे. Pune Fire | Fire in the basement of the building in front of the Wonderland building on MG Road in the camp area of Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एम.जी.रोड रोडवर वंडरलँड ही प्रसिद्ध इमारत आहे.
त्या इमारती समोरच जुनी एक कॅम्पेलक्स असणारी इमारत आहे.
येथे तळमजला आहे. तर दुकाने आहेत.
या तळ मजल्यावर एक टेलरिंगचे मटेरियल ठेवत असे. साड्या व इतर साहित्य ठेवलेले होते.
दरम्यान आज 4 वाजण्याच्या सुमारास अचानक येथे आग (Fire) लागली.
ही माहिती येथील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
त्यानंतर 4 फायर बंब आणि जवान दाखल झाले.
त्यांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नुकतीच फॅशन स्ट्रीट मार्केटला (Fashion Street Market) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण अनेकांचा व्यवसाय देखील ठप्प झाला होता.
त्यामुळे आग लागल्याचे समजताच अग्निशमन दल यांनी तात्काळ धाव घेतली.
यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.
आग लवकर आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
प्रभारी अधिकारी प्रदीप खेडेकर, केदारी, हनुमंता कोळी, सचिन जवनजाळे, छगन मोरे, प्रताप फणसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.
Web Title : Pune Fire | Fire in the basement of the building in front of the Wonderland building on MG Road in the camp area of Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | समाजसेवेची बीजे बालपणापासूनच मुलांमध्ये रुजवावीत – माधुरी सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन