पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire | उत्तमनगर येथील कोपरे गावाजवळील (News kopare gaon uttamnagar) एका बस गॅरेजच्या शेजारी साठा करुन ठेवलेल्या थिनरच्या बॅरेलच्या साठ्याला भीषण आग लागली. त्यात तेथे असणारे दोघे भाडेकरु जखमी झाले आहेत. या आगीमध्ये या शेडबाहेर उभ्या असलेल्या दोन लक्झरी बसगाड्या जळून खाक झाल्या असून शेडमधील 15 ते 20 बॅरेल जळून गेले. सुमारे 2 तासात ही आग भडकत (Pune Fire) होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अग्निशमन दलाकडून (fire brigade) मिळालेल्या माहितीनुसार, कोपरे गावाजवळ (News kopare gaon uttamnagar) एका बस गॅरेजच्या शेजारी एका शेडमध्ये थिनरचा बेकायदेशीरपणे मोठा साठा करुन ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या शेडमधील या साठ्याला आग लागली. त्यात येथील दोघे भाडेकरु भाजले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. Pune Fire | A huge fire at the Thinner stock in Uttamnagar Pune Two tenants injured 2 luxury buses burnt to ashes
या ठिकाणी थिनरचे 15 ते 20 बॅरेल एकमेकांना लागून ठेवण्यात आले होते. या आगीचा भडका होऊन शेड या बॅरलवर कोसळले होते. सिंहगड रोडवरील अग्निशमन केंद्राची पहिली गाडी घटनास्थळी पोहचली. या गाडीवर अधिकारी नसल्याचे समजते. जवानांनी आग पाहून तातडीने पाणी मारण्यास सुरुवात केली. मात्र, आग विझण्याऐवजी ती अधिकच भडकली. तोपर्यंत इतर केंद्रावरील गाड्या घटनास्थळी पोहचल्या. पाणी मारणे थांबून फोमचा समावेश असलेला मारा सुरु करण्यात आला. परंतु, जळणार्या बॅरेलवर शेडचे पत्रे पडले असल्याने फोमचा उपयोग होत नव्हता. तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग सुरु असतानाच हे पत्रे हुकाच्या सहाय्याने बाजूला केले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. ही आग शेजारील बस गॅरेजमध्ये पोहचून तेथील इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. या शेडच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन लष्करी बसला झळ बसली असून त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ही जागा गायकवाड यांच्या मालकीची असून त्यांनी ती दोघांना भाड्याने दिली आहे. मात्र, तेथे काय व्यवसाय चालू होता, इतक्या बॅरेलचा साठा कशासाठी केला होता, याची त्यांना काही माहिती नाही. भाजलेल्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असून आग कशी लागली, हे त्यांच्या जबाबातून समोर येऊ शकणार आहे.
Web Title :- Pune Fire A huge fire at the Thinner stock in Uttamnagar Pune Two tenants injured 2 luxury buses burnt to ashes
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update