फरझाना अयुब शेख यांची पुणे मनपा आरपीआय गटनेतेपदी निवड
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महानगरपालिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गटनेतेपदी आरपीआय नगरसेविका फरझाना अयुब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशा आशयाचे पत्र पक्षातर्फे महापौरांना देण्यात आले.
फरझाना अयुब शेख या प्रभाग क्र. 2 मधून आरपीआय-भाजप आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची ही पहिलीच टर्म असून, महिलांचे शिक्षण, युवक व युवतींना स्वयंरोजगार, प्रभागाचा आमूलाग्र विकास करतानाच शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा व सामाजिक, धार्मिक सलोख्यासाठी विशेष प्रयत्न हा आपला अजेंडा असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले. आरपीआय गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांचे पती अॅड. अयुब शेख माजी नगरसेवक व माजी शिक्षण मंडळ सदस्य तसेच आरपीआय महाराष्ट्र अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल आरपीआय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
Comments are closed.