बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील बँक ऑफ बडोदा येथे अज्ञाताने 100 रुपयांच्या 7 बनावट नोटा भरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 2018 मध्ये हा प्रकार घडला असावा असा संशय आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुदामा उभे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बँक ऑफ बडोदा येथे नोकरीस आहेत. दरम्यान पुण्यातील कोणत्या तरी बडोदा शाखेत अज्ञाताने 100 रुपयांच्या 7 नोटांचा भरणा केला होता. त्याने खऱ्या नोटा असल्याचे भासवून हा भरणा केला. तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. साधारण 2018 मध्ये हा प्रकार घडला असावा असा संशय आहे. त्यानंतर याची बँकेची पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.