बहुजननामा ऑनलाइन – लग्नाला नकार दिल्यानंतरही तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी 22 वर्षीय चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल विटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे ते जुलै 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपीची तोंडओळख आहे. दरम्यान तरुणाने तरुणीला लग्नासाठी विचारले होते. यावेळी तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. तरीही राहुल तिचा पाठलाग करत होता. तसेच तिच्यावर पाळत ठेवत होता. तसेच फोनकरून त्रास देत होता. तरुणीने अखेर त्याच्या त्रासाला कंटाळुन पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.