पुण्यात आघाडी अथवा युती झाली तरी शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

sanjay raut says shiv sena bhavan symbol maharashtras identity if you walk it you will get shivbhojan thali

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी  म्हणून एकत्र लढवल्या जाव्यात ही आमची भुमिका आहे. भाजपची जशी लाटेवर सत्ता आली यावेळी आमची लाट आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात आघाडी अथवा युती झाली तरी शिवसेना 80 जागांवर (80 seats shivsena) लढणार असे येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते.

याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.
राऊत म्हणाले, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवावी अशी आमची भुमिका आहे.
त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन निर्णय होईल . त्यानंतर आघाडी किंवा युती होऊन निवडणूक  झाली तरी आम्ही पुणे महापालिका निवडणुकीत 80 जागांवर (80 seats shivsena ) निवडणूक लढणार आहोत.
त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे .
पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली याबद्दल जनमानसात त्यांची छबी लोकप्रिय झाली आहे.
याबळावर आम्ही सर्वच महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करू, असा विश्वास असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याची घोषणा केल्याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
ते स्वबळावर केंद्रात सत्ता आणू शकत असतील तर त्यांना आम्ही पाठींबा देऊ .अशी भूमिका मांडतानाच राऊत यांनी पटोले यांना चिमटा काढला.

महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. परंतु स्थानिक पातळीवर काही ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. वरिष्ठ स्तरावर चर्चेने यातून मार्ग काढण्याची तिन्ही पक्षातील नेत्यांची कार्यपद्धती आहे. परंतु यानंतरही स्थानिक पातळीवर शिवसेनेला कोणी त्रास दिला तर आम्ही सहन करणार नाही.
आम्ही त्याठिकाणी शिवसैनिकांच्या मागे उभे राहू.
आम्हाला सत्तेपेक्षा शिवसेना महत्वाची आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आम्ही पाठीत नाही छातीवर वार करतो

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला आहे.
यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही.
समोरून वार करते आणि छातीवर वार झेलते.
पाठित खंजीर खुपसने हा शब्द आता गुळगुळीत झाला आहे.
असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कृपया हे देखील वाचा:
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय ! खासगी रूग्णालयांना आणखी एक दणका

डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाला पुन्हा कोरोनाची लागण, धारुर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस

29 वर्षीय डॉक्टर तरुणीची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या

सोमवारपासून अनलॉक मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षाच?

माजी मंत्री, माजी खासदार शंकर नम यांचे निधन