पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ऑनलाइन झालेल्या तलाठी परीक्षेत तोतया परीक्षार्थी बसवण्यात आला असल्याचे प्रकार समोर आला आहे. 2019 मध्ये झालेली ही परीक्षा असून, आता हा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरवरून हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी नेमीचंद विठलं सिंग ब्रह्मनात (वय 39), रामेश्वर विठ्ठल जरवाल (वय 27) यांच्यासह यांच्या जागी परीक्षा देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माधुरी आंधळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत नोकरीस आहेत. त्या तहसीलदार आहेत.
2019 मध्ये ऑनलाइन तलाठी पदासाठी परीक्षा झाली होती. या दोघांचे सेंटर आंबेगाव बुद्रुक परिसरात एका स्कुलमध्ये झाली होती. या दोघांचा क्रमांक येथे आला होता. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला बसविले. आणि ती परीक्षा उत्तीर्ण देखील झाले. यानंतर त्यांची जॉइनिंग देखील झाली. अहमदनहर येथे ते नोकरी करत होते. नोकरी जॉइनिंग केल्यानंतर पुन्हा साधन व्हीरिफिकेशन करते. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यात या दोघांनी त्यांच्या जागी दुसऱ्यांना परीक्षेला बसविले असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.