पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | वैद्यकीय मदतीसाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांच्यासह 4 महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा (रा. कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे (MLA Meghana Bordikar Sakore), आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) आणि आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक (Cheating Case) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पूजा सतीश मिसाळ (Pooja Satish Misal) यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार केली होती.
त्यांनी प्राथमिक तपास करुन पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Police Inspector Vilas Sonde) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Cyber Crime | Cheating with 4 BJP women MLAs including MLA Madhuri Misal
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर