पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सतत बँक, पोलीस व प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून बँक खात्याची कसलीच माहिती देऊ नये असे बजावत असतानाही सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यानी केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेची अडीच लाख घेऊन फसवणूक केली आहे.
याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर येथे राहतात. त्यांचे पती सीए आहेत.
दरम्यान त्यांचे हडपसर येथील एका बँकेत बचत खाते आहे.
मंगळवारी त्यांना एका क्रमांकावरून मॅसेज आला. त्यात केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठीची लिंक दिली होती.
तर ही लिंक ओपन करणेबाबत मॅसेजमध्ये सांगितले होते. यादरम्यान फिर्यादी यांना काही दिवसांपूर्वीच बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोस्टामार्फत पत्र आले होते.
त्यामुळे हा मेसेज बँकेकडून आला आहे, असे समजून त्यांनी लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यावरून 14 ट्रांजेक्शन करून त्याद्वारे 2 लाख 50 हजार 558 रुपयांची फसवणूक केली आहे.
पैसे कट होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीती घेतली असता फसवणूक झाल्याचे समजले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.
दरम्यान बँक कोणताही केवायसी अपडेट किंवा इतर माहितीसाठी लिंक टाकत नाही. किंवा त्यांचे मॅसेज येत.
याबाबत पोलीस प्रशासन सतत आवाहन करते. तर बँक देखील असे होत नसल्याचे मॅसेज करत असतात. मात्र तरीही नागरिक फसत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’
लॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा
महावितरणचे उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश
Desirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची भूमिका