Pune Cyber Crime | ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पुनावालांना 1 कोटीचा गंडा ! पुणे पोलिसांची धडक कारवाई; वेगवेगळ्या राज्यातून 7 जणांना अटक, आरोपींमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियरचा समावेश

Pune Cyber Crime | 1 crore cheating with adar poonawalla of 'Serum Institute' ! Pune Police Strike Action; 7 people arrested from different states, software engineer is among the accused

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Cyber Crime | कोरोनाची लस पुरवठा करणारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनाच सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बंडगांर्डन पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांमधील 7 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. हा प्रकार 7 सप्टेंबर 2022 रोजी घडला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आरोपींनी अदर पुनावाला यांचा मोबाईल नंबर हॅक करुन बनावट व्हॉट्सअॅप मेसेज कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर पाठवला होता. ‘मी मिटींग मघ्ये व्यस्त आहे, मला फोन करु नका, मी पाठवलेल्या 8 बँक खात्यावर तात्काळ पैसे पाठवा’ असा मेसेज देशपांडे यांना पाठवण्यात आला. हा मेसेज अदर पुनावाला यांचा असल्याचे समजून देशपांडे यांनी संबंधीत बँक खात्यावर 1 कोटी 1 लाख 1 हजार 554 रुपये पाठवले. (Pune Cyber Crime)

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी (8 सप्टेंबर) देशपांडे आणि अदर पुनावाला यांचे फोनवर बोलणे झाले त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचा कोणताही मेसेज केला नसल्याचे देशपांडे यांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तुर यांनी 8 सप्टेंबर रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

 

आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत पाहता आरोपींनी कोठेही आपल्या नावाचा उल्लेख न करता नामांकित कंपनीची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी हे बिहार, आसाम, ओरीसा, कोलकाता, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील निष्पन्न झाले. तसेच आरोपींनी ज्या बँक खात्यावर पैसे जमा करुन घेतले ते पैसे ओळखीच्या इतर आरोपींना पाठवल्याचे दिसून आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी ज्या खात्यावर सीरम इन्स्टिट्यूटचे पैसे वर्ग करण्यात आले होते, ती बँक खाती तसेच संबंधीत बँकेतुन इतर आरोपींना पाठवण्यात आलेले सर्व बँक खात्याची माहिती घेऊन ती खाती गोठवण्यात आली. आज पर्य़ंत एकूण 13 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यामध्ये गोठवण्यात आले आहेत.

 

गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींच्या मोबाईल नंबरचे लोकेशन प्राप्त करुन पोलिसांनी राजीव कुमार शिवजी प्रसाद (रा. परेमनटोला, पोस्ट कसदेवरा, जि. सिवान, बिहार), चंद्रभुषण आनंद सिंग (रा. छाप मठिया, जि. गोपालगंज, बिहार), कन्हैया कुमार संभु महंतो (रा. ग्राम जिगरवा, जी. सिवान, बिहार), रविंद्रकुमार हुबनाथ पटेल (रा. ग्राम गहरपूर, तहसील वाराणसी, उत्तर प्रदेश), राबी कौशल प्रसाद गुप्ता (रा. ग्राम देवा, पोस्ट चिंगवाह, मध्य प्रदेश), यासीर नाझीम खान (वय-27 रा. गुळागुडीका नाका, ग्वॉल्हेर, मध्य प्रदेश), प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. लाईन कोथरु रेगुपालेम, आंध्र प्रदेश) यांना अटक केली.

 

आरोपी सॉफ्टवेअर इंजिनीयर
आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान आरोपी प्रसाद लोवुडू हा सॉफ्टवेअर इंजीनियर असून राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे.
तो व्यावसायिक बँकेमध्ये नोकरी करत आहे. पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आणखी तपास करण्यात येत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे,
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते,
पोलीस उप निरीक्षक नळकांडे, गावडे, पोलस अंमलदार राजामार घोगरे, अशोक घेडगे, रामदास घावटे, रविंद्र जावळे,
अमोल सरडे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर, सागर घोरपडे, मनोज भोकरे, सुधीर घोटकुले, संजय वनवे, ज्ञाना बढे,
शिवाजी सरक यांची मदत झाली. तर आरोपींचे लोकेश प्राप्त करण्यासाठी पोलीस अंमलदार सागर घोरपडे,
मंगेश बोराडे व सायबर पोलीस ठाण्याचे प्रसाद पोतदार, अनिल पुंडलीक, शिरीष गावडे यांची मदत झाली.

 

Web Title :- Pune Cyber Crime | 1 crore cheating with adar poonawalla of ‘Serum Institute’ ! Pune Police Strike Action; 7 people arrested from different states, software engineer is among the accused

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

Jhund Movie Fame Babu | झुंड सिनेमातील ‘बाबू’ची भूमिका गाजवलेल्या अभिनेत्याला पोलिसांकडून अटक

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात