पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अनोळखी महिलेचा डीपी असलेल्या व्हॉटसअपवरुन चॅटींग (Whatsapp Chatting) करुन त्याचा न्युड व्हिडिओ (Nude Videos) बनवून तो अपलोड करण्याची भिती दाखवून तरुणाला ब्लॅकमेल (Blackmail) केले जात होते. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमोल राजू गायकवाड Amol Raju Gaikwad (वय २२, रा. तानाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांच्या भावाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१७/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गायकवाड हा आयटीआय झाला होता. त्याला एका अनोळखी महिलेचा डीपी असलेला व्हॉटसअॅप आला. त्याने त्याला प्रतिउत्तर दिल्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. चॅटींग करुन त्याचा न्युड व्हिडिओ बनविला गेला. तो अपलोड करण्याची भिती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली. वेळोवेळी त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये फोन पे वरुन घेतले. या मानसिक त्रासाला कंटाळून अमोल याने “मै सुसाईड कर रहा हु” असा मेसेज नमूद करुन तो मोबाईल धारकास पाठविला. तेव्हा त्याने “करो मै व्हिडिओ ऑनलाइृन करता हुं” असे म्हणून सतत पैशांची मागणी केली. त्यामुळे ३० सप्टेबर रोजी दुपारी अमोल याने आत्महत्या केली.
याबाबत सहकारनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद करुन तपासाला सुरुवात केली.
त्यात अमोल याचा मोबाईल तपासला असता, व्हिडिओ, त्याचे झालेले चॅटिंग व त्याने फोन पे द्वारे पाठविलेले पैसे हा सर्व तपशील समोर आल्यावर त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले.
पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर (Police Inspector Prakash Pasalkar) अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Woman threatens young man to spread nude video viral, youth commits suicide in Dhankawadi area
हे देखील वाचा :
Jayant Patil | सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे सध्या महत्वाचे, जयंत पाटील यांनी मांडली पक्षाची भूमिका