पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगोली वडावराव ही महिला दुपारी दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk) येथील हॉटेलमध्ये एक दिवसाकरीता राहावयास आली होती. सायंकाळी वेटरने दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल चालकाने पोलिसांना कळवले. रात्री पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी महिलेने गळफास घेतल्याचे दिसून आले. हवेली पोलीस ठाण्यात (Haveli police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोनच महिन्यापूर्वी झाला होता विवाह
रंगोली वडावराव या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना पहिल्या पतीपासून सात वर्षाचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
Web Title :- Pune Crime | woman commits suicide in sinhagad road police station area of pune she was married before twot months
का खर्च करायचे 12 लाख, जर येथे 3.8 लाखात मिळत आहे Mahindra Scorpio, जाणून घ्या सविस्तर ऑफर
Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण
Pune Crime | पुण्यात तृतीयपंथी ‘आशु उर्फ आनिश’ खून, 4 तासात ‘धर्मु ठाकुर’ आणि युगल ठाकुर गजाआड