पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मिळकत कराचे बनावट कागदपत्रे व खोटे खरेदीखत (fake documents) तयार करून त्याआधारे बँक मॅनेजरच्या मदतीने 70 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेत बँकेचीच फसवणूक (Pune Crime) करण्यात आली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (sinhagad road police) तिघांना अटक केली आहे. Pune Crime | with the help of a bank manager three person cheated with bank in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनोज कैलास गायकवाड (ता. ४७, रा. धनकवडी), शेखर प्रल्हाद साळुंके (वय ४३) आणि सचिन प्रल्हाद साळुंके (वय ४३, दोघेही रा. सदाशिव पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर बँक मॅनेजर (Bank manager) कुमार सिद्धेश्वर पारखी (रा.बुधवार पेठ) आणि प्रमोद अरुण मोघे (रा. पर्वती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
रमेश निवृत्ती डिंबळे (वय ५२, रा. आंबेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान शारदा सहकारी बँकेच्या सिंहगड रस्ता शाखेत हा प्रकार घडला.
बँकेची फसवणूक (Fraud) करण्यासाठी आरोपींनी मोघे याच्या मिळकत कराचे बनावट कागदपत्रे वापरून गायकवाड याने उंड्री येथील एक रो हाऊसचे बनावट खरेदीखत तयार केले.
त्या खरेदीखताचा वापर करून त्याने बँकेकडून ७० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.
पारखी याने त्याच्या पदाचा गैरवापर करून कर्ज मंजूर करताना कागदपत्रे तपासली नाहीत.
अशी फिर्याद देण्यात आली आहे.
Corona News | कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? WHO चे प्रमुख म्हणाले…
या गुन्ह्यात आरोपींना इतर कोणी मदत केली याचा तपास करायचा आहे.
तसेच गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याचा मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.
त्यानुसार न्यायालयाने त्यांना १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) करीत आहेत.
Web Title : Pune Crime | with the help of a bank manager three person cheated with bank in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update