पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी पत्नी आईवडिलांसोबत पोलीस ठाण्यात (Pune Police) जात होती. यावेळी वाटेत पतीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अक्षय मोहन सोनार Akshay Mohan Sonar (वय २७, रा. गोलघर, शिवदर्शन) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी कार्तिका अक्षय सोनार Karthika Akshay Sonar (वय २०) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५७/२२) दिली आहे. ही घटना शिवदर्शनमधील गजानन महाराज मंदिराच्या मागील गेटसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि कार्तिका हे दोघे पती पत्नी आहेत.
त्यांच्यात भांडणे झाली होती. तेव्हा कार्तिका ही आपल्या आई वडिलांसोबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार
देण्यासठी जात होते. यावेळी अक्षय हा पाठीमागून अचानक आला.
त्याने फिर्यादी यांना काही कळायचे आत त्यांना एका हाताने पकडून दुसर्या हातातील चाकूने
‘‘आता तुला मारुनच टाकतो’’ असे बोलून त्यांच्या गळ्यावर सपासप वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
कार्तिका यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक निकाळजे (Sub-Inspector of Police Nikalje) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Wife was stabbed on the neck when she was going to file a complaint with the police; Incident at Shivdarshan in Parvati
हे देखील वाचा :
Pune Fire News | वानवडीतील आगीत चार घरे जळून खाक
Bhaskar Jadhav | भाजप आकसापोटी विरोधकांवर करत आहे कारवाई – आ. भास्कर जाधव
Sanjay Raut | अटकेची घाई, सुनवाई मात्र नाही; विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशाची ईडीवर टीका