पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | नातलगाला सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसह तिच्या पतीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) राडा घालून पोलिसांना शिवीगाळ केली. पतीने डोके खिडकीवर आपटून हातात काच घेउन पळत सुटून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी ठाण्यात घडली. (Pune Crime)
सुनील आणि नीता दनाने (दोघे रा. कळस, विश्रांतवाडी ) अशी गुन्हा दाखल केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अस्मिता लावंड यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर वादावादी घातल्याप्रकरणी विश्रांतवाडी बीट मार्शलांनी अजय रिठे याला ठाण्यात आणले होते. त्याची माहिती मिळल्यानंतर दनाने दाम्पत्य पोलिस ठाण्यात आले.
त्यावेळी सुनीलने रिठे याला घेउन जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिस अमलदार लावंड यांनी त्याला अडविल्याचा राग आल्यामुळे आरोपी सुनीताने त्यांना धक्काबुक्की केली.
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांच्या अंगावर जाउन त्यांचा अंगठा पिरगळला.
त्यानंतर सुनीलने डोके खिडकीवर आपटून काच फोडून हातात घेत पळत सुटला.
Web Title :- Pune Crime | Vishrantwadi police station news
हे देखील वाचा :
Tulsi Benefits | चमत्कारी आहेत ‘या’ तुळशीचे फायदे, जाणून घ्या कसा करावा वापर