Pune Crime | दिवसाढवळ्या व्यावसायिकावर हल्ला करुन लुटणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांकडून अटक

Pune Crime | Viman Nagar Police arrested three people for attacking and robbing a businessman in broad daylight in pune
February 10, 2022

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सरबत पिण्यासाठी थांबलेल्या एका व्यावसायिकावर हल्ला (Attack) करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक केली आहे. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) नगर रोडवरील मंत्री आयटी पार्कच्या (Mantri IT Park) गेटजवळ असलेल्या दुकानासमोर घडली होती.

महादेव सुभाष साठे (वय-21), सोमनाथ संजय कांबळे (वय-19), अनुराग भुजंग ससाणे (वय-19 तिघे रा. यमुनानगर, विमाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडिया Siddhant Champalal Chordia (वय-30 रा. कळसगाव, आळंदी रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी सिंद्धात हे सरबत पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची लॅपटॉपची (Laptop) बॅग जबरदस्तीने घेतली. तसेच बॅग परत करण्यासाठी 2500 रुपये मागून फिर्यादी यांना लोखंडी कोयता, फायटर, रॉड, पाण्याचा कॅन आणि वायरने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच खिशातील 2500 रुपये व लॅपटॉप घेऊन पळून गेले होते. (Pune Crime)

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव (Police Sachin Jadhav) आणि प्रदिप मोटे (Police Pradip Mote) यांना गुन्ह्यातील आरोपी फोर पॉईंट हॉटेलच्या (Four Point Hotel) बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची शाहनिशा करुन सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादी यांची चोरलेली रोख रक्कम आणि मारहाण करण्यासाठी वापरलेला लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, फायटर जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, रमेश लोहकरे, उमेश धेंडे, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, विनोद महाजन, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

 


Web Title :-
Pune Crime | Viman Nagar Police arrested three people for attacking and robbing a businessman in broad daylight in pune

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ! जाणून घ्या किती वाढणार पगार

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

Nawab Malik | नवाब मलिकांचा थेट निशाणा, म्हणाले -‘ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे फडणवीस यांचे कटकारस्थान, ते ईडीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात’