पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | ‘द आरोमा स्पा’ या वानवडीतील (the aroma spa, wanwadi) स्पा सेंटरमध्ये नेमलेल्या मॅनेजरच्या ओळखीच्या लोकांनी स्पाचे कुलूप तोडून आतील सामानाची तोडफोड करुन काऊंटरमधील २७ हजार ७८० रुपये जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) निकीता निनाद नाईक (वय २९, रा. विक्रांत आर्केड, आंबेगाव बु़), तन्वी संजय पोटे (वय २६, रा. उंड्री गाव), सिद्धार्थ राजेंद्र हरके (वय २९) आणि अब्दुल अलहदी मसुद अहमद (रा. उंड्री गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी युवराज आनंत पाटील (वय ३२, रा. मल्हार कॉलनी, मांजरी बु़ ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ ऑगस्ट रोजी पहाटे चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला होता.
युवराज पाटील यांचे वानवडीमधील केदारीनगर येथील रविराज बिल्डींगमध्ये द आरोमा स्पा हे स्पा सेंटर आहे. स्पा सेंटरच्या मॅनेजर पूजा सिंग आहेत. त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्पाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील वुडन डोअर, ग्लास डोअर, काऊंटर, टेबल बाथरुम दरवाजा, कमोड, फ्लॅश, दोन्ही रुममधील आरसे यांची तोडफोड केली. कॉस्मेटीक मटेरीअल आतून दिले. दुकानाचे काऊंटर तोडून सुमोर १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केले. काऊंटरमधील २७ हजार ७८० रुपये चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.
Web Title : pune crime vandalism at daroma spa in wanwadi area crime against four including 2 women
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Unicef New Report | युनिसेफ रिपोर्ट : भारतासह जगातील 1 बिलीयन मुलांना जलवायु परिवर्तनाचा गंभीर धोका