पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मोबाईल कंपनीचे सीमकार्डची केवायसी (KYC) महिती अपडेट (Sim card Update) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (Cyber thieves) हिंजवडीतील एकाला ऑनलाईन सव्वा दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. हा प्रकार बावधन येथे शनिवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. सिम कार्ड अपडेट (Sim card Update) करण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणाने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत (Pune Crime) असल्याचे पहायला मिळत आहे.
मनिष अवधेश आनंद (वय-42 रा. पेबल्स 2, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 8584083977 या मोबाईल धारकावर आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या मोबाईलवर एकाने फोन केला. त्यांना मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगितले. तक्रारदार यांच्या वडिलांना 10 रुपयाचे रिचार्ज करण्यास सांगितले. तसेच वडिलांच्या मोबाईलवर लिंक पाठवून क्लिक करण्यास सांगितले. सायबर चोरट्याने टीम व्हुवर क्विक सपोर्ट (Team Viewer Quick Support) या मोबाईल अॅपच्या मदतीने वडिलांच्या बँक खात्यातील 2 लाख 25 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर (Online transfer) करुन घेतले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
Web Title : pune crime updating kyc costly online rs 2 25 lakh
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी