पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दहीहंही उत्सवात (Dahi Handi-2022) पूर्ववैमनस्यातून दोन गुन्हेगार (Pune Criminals) टोळ्यांमधील वैमनस्य पुन्हा उफाळून आले. एका टोळीने दुसर्या टोळीतील गुन्हेगारावर डोक्यात कोयत्याने वार केले तर, दुसर्या गुन्हेगाराने हवेत गोळीबार (Firing In Pune) केला. सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk, Pune) येथील समर्थनगर येथील दहीहंडी उत्सवात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. (Pune Crime)
या घटनेत शुभम मोरे (Shubham More) हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सराईत गुन्हेगार चेतन ढेबे (Chetan Dhebe) व किरण चांदणे (Kiran Chandane) यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. समर्थनगर येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार सायंकाळी त्या ठिकाणी दोन्ही गटाचे गुन्हेगार एकत्र आले. त्यावेळी चेतन ढेबे व त्यांच्या साथीदारांनी किरण चांदणे याच्या टोळीतील शुभम मोरे याच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. त्याचवेळी झालेल्या गोंधळात एकाने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गुन्हेगार पसार झाले होते. सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Two groups fired, knifed at Dahihandi festival; Incident at Vadgaon Budruk on Sinhagad Road
हे देखील वाचा :