पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | फेसबुकवर मैत्री (Friendship On Facebook) करुन शारिरीक संबंध (Physical Relation) करण्यासाठी बोलावून त्याचा व्हिडिओ (Video) काढत असल्याचे भासवून चौघा जणांनी एका तरुणाला बदनामीची (Deformation) धमकी देऊन खंडणी (Ransom) उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदाम चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार गुरुवार पेठेतील गौरी आळी (Guri Ali, Guruwar Peth, Pune) येथील एका घरात २९ मे रोजी २ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडला होता. (Pune Crime) याप्रकरणी वडगाव शेरी (Wadgaonsheri) येथील एका २४ वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५७/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा पुण्यात एका होस्टेलमध्ये (Hostel In Pune) राहतो. तो आणि साहिल कुरेशी यांची फेसबुकवरुन मैत्री झाली होती. साहिल याने त्याला शारिरीक संबंध करण्याच्या बहाण्याने गुरुवार पेठेतील घरात बोलावून घेतले. तेथे चार आरोपींनी शारिरीक संबंध करीत असताना (Gay Men’s Relationships) फिर्यादी यांचा व्हिडिओ काढत असल्याचे भासविले. फिर्यादी यांना ते Gay असल्याचे दाखवून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना रुममध्ये डांबून ठेवून त्याच्या मोबाईलवरुन ५५ हजार ६८९ रुपये आनॅलाईन आरोपीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करुन घेतले. खडक पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Threatening to defame being gay by removing a video of a sexual relationship take ransom from 24 year old
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Pune Crime | ज्ञानवापी मशिदीतील वादात भाजपा महिला प्रवक्त्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Krishnakumar Kunnath – Singer KK | प्रसिद्ध गायक केके यांचे 53 व्या वर्षी निधन