पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | चोरटे एटीएम (ATM Center) फोडत असल्याची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) पोलीस मार्शल (Beat Marshall Police) तातडीने तेथे पोहचले. चोरट्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी मोठ्या धाडसाने दोघा चोरट्यांना जेरबंद केले. (Pune Crime) प्रशांत अभिमान कसबे (वय १९, रा. चव्हाणनगर, धनकवडी), तेजस राजु जाधव (वय १९, रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील आकाशवाणी (Akashwani Hadapsar Pune) येथील आयडीबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये (IDBI Bank ATM) बुधवारी पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी घडली. (Pune Crime)
याप्रकरणी पोलीस अंमलदार (Pune City Police) श्याम पांडुरंगराव येदले (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. आयडीबीआय बँकेच्या सर्व एटीएम सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी एका कंपनीवर सोपविण्यात आली आहे. एटीएम सेंटरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे परीक्षण कंपनीच्या नियंत्रण कक्षातून (Pune City Police Control Room) केले जाते. हडपसर येथील आकाशवाणी जवळ असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोघे चोरटे शिरले. त्यांनी मशीन फोडून जबरी चोरीचा प्रयत्न सुरु केला. नियंत्रण कक्षातील कर्मचार्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच मार्शल श्याम येदले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. तेव्हा एटीएम सेंटरमध्ये दोघे जण होते. पोलिसांना पाहून प्रशांत कसबे याने त्याच्याकडील कोयता घेऊन श्याम येदले यांच्या अंगावर धावून आला. तेजस जाधव याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. असे असतानाही त्यांनी दोघांना धरुन ठेवले. पोलिसांची जादा कुमक तातडीने तेथे पोहचली. त्यांनी दोघा चोरट्यांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक दिंगबर सोनटक्के (PSI Dingbar Sontakke) अधिक तपास करीत आहे.
Web Title :- Pune Crime | Thieves vs Pune police Beat Marshall Attempt to stab police two arrested Morning incident in Hadapsar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी