पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या बहाण्याने आलेल्या चार जणांनी हॉस्पीटलमधील कर्मचाराऱ्याला मारहाण करुन मेडिकल काऊंटरमधील रोकड आणि इंजेक्शन चोरुन नेले. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) उंड्री येथील इंडस हॉस्पीटलमध्ये (Indus Hospital Undri) गुरुवारी (दि.22) रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी हॉस्पिटलमधील 24 वर्षीय कंपाऊंडरने शनिवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरुन चारजण हॉस्पीटलमध्ये आले. पायाला जखम झाली असून उपचार करा असे सांगितले. उपचार करण्यासाठी फिर्यादी साहित्य
शोधत असताना आरोपींनी हॉस्पिटलच्या मेडिकल काऊंटरमधील (Medical counter) 8 हजार रुपये रोख, इंजेक्शन (Injection) व औषधे असा एकूण 13 हजार रुपये किमतीचा माल जबरदस्तीने काढून घेतला.
Pune News | पुणे जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण
फिर्यादी यांनी विरोध केला असता एकाने डोक्यात खुर्ची फेकून मारली. तर इतर आरोपींनी लोखंडी
पाईपने फिर्यादी यांना बेदम मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी
शनिवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. मोहिते (API R.S. Mohite) करित आहेत.
Web Title :- pune crime thieves looted cash claiming to be injured beating the compounder of indus hospital undri fir in kondhwa police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी
Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राविषयी माहिती देणार्या अभिनेत्रीला गुन्हे शाखेचे समन्स
Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’