पुणे : बहुजननामा ऑनलाइन – निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस (Retired DGP Ajit Parasnis ) यांच्या पुण्यातील (Pune Crime) बहिणीच्या घरात चोरी (Burglary) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी पुण्यातील (Pune Crime) प्रभात रस्ता (Prabhat Road) परिसरात घडली. चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने (Jewelry) चोरुन नेले.
उज्वला वसंत पारसनीस Ujwala Vasant Parsnis (वय-63 रा. अभिमान अपार्टमेंट, पाचवी गल्ली, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. उज्वला पारसनीस या घरात एकट्या राहतात. गुरुवारी सायंकाळी त्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री घरी परत अल्यानंतर घराच्या खिडकीचे गज कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी रुममधील एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे (Senior Police Inspector Muralidhar Karpe) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
Web Title :- Pune Crime | theft in Retired Director General of Police Ajit Parsnis’s sister’s house in Pune prabhat road
Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…
PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या
Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘ एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’