पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मुंबई -पुणे महामार्गावरील दापोडी येथील सीएमई (CME) गेटसमोरुन मोटारसायकलस्वार जात असताना त्याच्या गळ्यात पतंगीचा मांजा अडकून जखमी झाल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
आशिष सुरेश पवार (वय ३२, रा. भाऊ पाटील चाळ, साळवेनगर, बोपोडी) असे जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे.
दुचाकीवरुन जाताना पंतगीचा मांजा गळ्याला अडकून त्यामुळे गळा कापला जाऊन शहरात काही जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सर्वत्र चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आशिष पवार हे सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मोटारसायकलवरुन मुंबई -पुणे महामार्गावरुन (mumbai pune highway) जात होते.
सीएमई गेटसमोर (cme pune) ते आले असताना कोणाचा तरी पंतग उडविताना पंतग कट झाला व मांजा रस्त्यावर पडला. त्याचवेळी आशिष पवार तेथून जात असल्याचे तो मांजा त्यांच्या गळ्याला व बोटाला लागून ते जखमी झाले.
भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध (गु. र. नं. ६५५/२१) गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : Pune Crime | The cat hit the motorcyclist in the neck and injured; The incident took place in front of CME gates on Mumbai-Pune highway.