पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | गोविंदा कादरखानच्या फाईव्ह स्टार हॉटेलसमोर टपरी टाकतो, त्यातून ‘दुल्हे राजा’ चित्रपटात मनोरंजनाचा मोठा धमका उडताना चित्रपटात दाखविला आहे. मात्र, मावळ तालुक्यात असाच प्रकार घडला असून त्यात हॉटेल चालकाने टपरीचालकावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न (Pune Crime) केला आहे.
याप्रकरणी उमेश वसंत बालगुडे (वय ३२, रा. पाथरगाव, कामशेत, ता. मावळ) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन कामशेत पोलिसांनी (kamshet police) सत्येंद्रसिंह प्रेमसिंग चौहान ऊर्फ ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मुंढावरे गावाच्या हद्दीत हॉटेल राधे राधे (Hotel Radhe Radhe) याच्या जागेच्या आत मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश बालगुडे याने हॉटेल राधे राधेचा चालक सत्येंद्रसिंह चौहान याच्या जागेत त्याच्या परवानगी नसताना टपरी लावली.
त्यामध्ये नाष्ट्याचे पदार्थ ठेवणार असल्याचा तसेच बालगुडे याच्या त्रासाला कंटाळून त्याचे कामगार काम सोडून निघून गेले.
या कारणावरुन सत्येंद्रसिंह याने राग मनात धरुन उमेश बालगुडे याच्याशी बाचाबाची करुन शिवीगाळ केली. सत्येंद्रसिंग याने त्याच्याकडील तलवारीने बालगुडे याच्या डोक्यात वार करुन डोक्यास गंभीर जखमा केल्या.
तलवारीने केलेल्या वारामुळे बालगुडे यांच्या कवटीचे हाड फॅक्चर केले. डाव्या हाताचा अंगठा कापून तोडला.
कामशेत पोलिसांनी (kamshet police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Story of ‘Dulhe Raja’ movie in Pune ! The hotel owner tried to kill pan shop owner with a sword.