पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | पाच हजार रुपयांच्या मोबाईलच्या व्यवहारातून तिघा अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाच्या (Minor Child) डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या तिघांनी या मुलाचे डोके दगडाने इतक्या जोरात ठेचले की, त्याच्या कवटीपर्यंत तडा गेला असून भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून तो बोलण्याच्या (Pune Crime) स्थितीत नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहन डोईफोडे Rohan Doiphode (वय 16, रा. नर्हे) असे या जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगावमधील शिल्प सिद्ध इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या शेतामध्ये सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनच्या ओळखीच्या असलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एकाने त्याच्याशी मोबाईल बाबत व्यवहार केला होता. 5 हजार रुपयांच्या मोबाईलचा व्यवहार फिसकटल्याने तिघांनी रोहन याच्या डोक्यात व शरीरावर ठिकठिकाणी दगडाने मारहाण (Beating) करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही घाबरुन गेले. तिघेही पळत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आले. त्यांची हकिकत ऐकल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहन याला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्चे (PSI Karche) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Stone crushed head of a minor boy for 5 thousand mobiles; Incidents in Ambegaon area
हे देखील वाचा :
Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’ कायम राहणार; जाणून घ्या कसे