पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सावत्र बापाने १५ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार (Rape In Pune) करुन तिला ३ महिन्यांची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. याबाबत हडपसर येथील रामटेकडीमध्ये (Ramtekdi, Hadapsar) राहणार्या एका ३५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महिलेच्या दुसर्या पतीला अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या महिलेला १५ वर्षाची पहिल्या पतीपासूनची मुलगी आहे. तिने २५ वर्षाच्या आरोपीबरोबर दुसरा विवाह केला.
त्याने तिच्या १५ वर्षाच्या मुलीच्या बाजूला रात्री झोपून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी हिने मुलीकडे चौकशी केली.
त्यातून तिच्याच दुसर्या पतीचा कारनामा समोर आला. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Stepfather made 15-year-old girl pregnant; father arrested, FIR in Wanwadi police station
हे देखील वाचा :
Pune Crime | बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने गुंडांनी तरुणाचा केला खून; आंबेगावमधील घटना
Girish Mahajan | ‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून?’ तपासण्याची गरज, गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान