पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नग्न महिलांच्या शरीर असलेल्या फोटोमध्ये वस्तीमधील मुलींचे चेहर्यांचे फोटो चिकटवून (Photo Morphing) त्याचे अश्लिल फोटो तयार (Pune Crime) करणार्या तरुणाला खडकी पोलिसांनी (Khadki Police Police) अटक केली आहे.
शुभम कैलास आवळे Shubham Kailas Awale (वय २५, रा. राजीव गांधीनगर, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणाने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि शुभम हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी याने आरोपीचा मोबाईल सहज बघण्यासाठी घेतला.
मोबाईलमधील गॅलरीमध्ये फोटो पाहत असताना त्यात फिर्यादीच्या बहिणीचे स्क्रिन शॉट केलेले फोटो आढळून आले.
तसेच नग्न महिलांचे शरीर असलेल्या फोटोमध्ये त्यांच्या वस्तीमधील मुलींचे चेहर्याचे फोटो चिकटवून त्यांचे अश्लिल फोटो तयार करुन ते मोबाईलमध्ये जतन करुन ठेवल्याचे दिसून आले. खडकी पोलिसांनी त्याला अटक (Pune Crime) केली आहे.
त्याने हे फोटो का तयार केले. त्याचा कशासाठी गैरवापर केला का याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatry Chavan) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking Police arrest man for making nude pornographic photos Photo Morphing in Pune.