Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 16 वर्षीय विद्यार्थ्यानं ट्युशन घेण्यासाठी घरी आलेल्या शिक्षीकेचा बाथरूममधील व्हिडीओ केला ‘रेकॉर्ड’

Pune Crime | Shocking In Pune, a 16 year old student record a video of a teacher coming home for tuition in the bathroom and washroom

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | घरी इंग्रजीची शिकवणी घेण्यासाठी (Tuition Classes At Home) येणार्‍या वयस्क शिक्षिकेचा एका १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने (Student) बाथरुममध्ये मोबाईल (Mobile In Washroom) लपवून ठेवून व्हिडिओ काढल्याचा (Video Shooting In Bathroom) धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी अलंकार पोलिसांनी (Alankar Police) कर्वेनगरमधील (Karve Nagar) एका १६ वर्षाच्या विधी संर्घषग्रस्त बालकावर गुन्हा (FIR On Student) दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ५६ वर्षाच्या शिक्षिकेने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील या मुलाच्या घरी ३ ते ३० मार्च २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिका गेली ५ वर्षे इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यासाठी त्याच्या घरी जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या मुलाच्या घरातील वॉशरुममध्ये गेल्या होत्या. त्या जाण्याअगोदर या मुलाने वॉशरुममध्ये मोबाईल (Mobile In Washroom) ठेवून त्यात व्हिडिओ रेकॉडिंग (Video Recording) चालू करुन ठेवला होता. या शिक्षिका नैसर्गिक विधी करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यापूर्वी त्या शिकवणी घेत असताना फिर्यादी यांच्या छातीचा व्हिडिओ (Video Of Chest) त्याने रेकॉर्ड केला होता.

शिकवणी सुरु असताना हा मुलगा मोबाईल कशासाठी हातात घेतो, याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडील मोबाईल घेऊ लागल्या. तेव्हा तो गडबडून गेल्याने त्यांचा संशय अधिकच वाढला. त्यांनी मोबाईल तपासल्यावर त्यांना त्यात त्यांचेच व्हिडिओ दिसून आले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगिता पाटील (Police Inspector Sangeeta Patil) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking In Pune, a 16 year old student record a video of a teacher coming home for tuition in the bathroom and washroom

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर

Pune Collector On Helmet Compulsion | ‘पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही’; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे स्पष्टीकरण

Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील गोदामाला भीषण आग ! फायबरचा कारखाना, स्पेअर्स पार्ट, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक; अग्निशामक दलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जखमी (VIDEO)