पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. मध्यंतरी शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of Minor Girl) करण्यात आला. तर एका ठिकाणी शाळेतच मुलीवर वार केल्याची घटना घडली आहे. या घटना ताज्या असतानाच पुण्यातील (Pune Crime) वर्दळीचे ठिकाण असलेल्या पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात एका सार्वजनिक शौचालयात (Public Toilet) 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार (Rape In Pune) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) 376(2), पॉक्सो कलम (Pocso Act) 4,12 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) 35 वर्षीय व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन जवळील जनसेवा लेडीज टॉयलेटमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-36) बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुटुंबासह पुणे स्टेशन परिसरात राहण्यास असून साफसफाईचे कामे करते.
शुक्रवारी दुपारी ते सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला.
त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
यानंतर आरोपी पळून गेला. दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मारवाडी नावाच्या एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking A 12 year old girl was raped in a public toilet in Pune all day long
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Beed Crime | धक्कादायक ! चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य; नातेवाईक आक्रमक