पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | महिलेला वारंवार लॉजवर घेऊन जाऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन एका 55 वर्षाच्या ज्येष्ठाने तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape In Pune) केला. तीने घरी जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला कॅनॉलवर नेऊन पाण्यात ढकलून (Pune Crime) देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आनंदा पाटील Ananda Patil (वय 56, रा. पर्वती पायथा, जनता वसाहत) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत जनता वसाहतीतील एका 38 वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना हिंगणगाव (Hingangaon), स्वारगेट (Swargate) येथील लॉज येथे 2019 पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी पाटील याने फिर्यादीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) केले. ही घटना कोणाला सांगितली तर त्यांच्यावर अॅसिड फेकून कुंटुबाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली. पाटील याने 4 जुलै रोजी फिर्यादीला स्वारगेट येथील लॉजवर नेले. तिथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. यावेळी फिर्यादी यांना त्यांच्या पतीचे वारंवार कुठे आहेत, हे विचारण्याकरीता फोन येत असल्याने फिर्यादी या घरी जाण्यासाठी धडपड करु लागल्या. तेव्हा आरोपीने तिला जनता हॉल येथे घेऊन आला. तेथे त्याने फिर्यादीला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. पाण्यातून नागरिकांनी या महिलेला बाहेर काढल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक मुळीक (PSI Mulik) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal
हे देखील वाचा :
Pune Crime | सासू, सासर्यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग