पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सोसायटीच्या गेटवर सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करणार्या एकाने गेटवरुन जाणार्या महिलेचा पाठलाग करुन ‘तू खूप सुंदर दिसतेस़ मला खूप आवडतेस, माझ्या सोबत फिरायला येतेस का’ असे विचारुन महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार वडगाव शेरी (vadgaon sheri) परिसरात घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) परिसरातील एका सोसायटीच्या सिक्युरिटी सुपरवायझरविरुद्ध विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कामाला जात असताना त्यांना सोसायटीच्या गेटवरुन पुढे जावे लागते. फिर्यादी या गेटवरुन कामावर जात असताना गेल्या 15 दिवसापासून सिक्युरिटी सुपरवायझर त्यांना त्रास देत होता. त्यांचा पाठलाग करीत होता. 25 ऑगस्ट रोजी फिर्यादी या गेटवरुन कामाला जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांना ‘‘तू खूप सुंदर दिसतेस, मला खूप आवडतेस, माझ्यासोबत फिरायला येतेस का’’ असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे अधिक तपास करीत आहेत.
Web Title : 5 money task alert complete these 5 money task before 30 september 2021 from check details here
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड