Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने उद्योजक महिलेला 1 कोटींचा गंडा; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात रवि कानकाटे व स्वप्नील कानकाटेविरूध्द गुन्हा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | उद्योजक महिलेला शेअर मार्केट (Stock Market) मध्ये गुंतवणूक (Investment) करून त्याचा दुप्पट परतावा (Double Return) करून देतो असे आमिष (Lure) दाखवून तब्बल एक कोटींची फसवणूक (Cheating Case) झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. आर्थिक फसवणुक (Fraud Case) करणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये (Lonikalbhor police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ममता सिंह मलिक (वय 38, सध्या रा. अमरवस्ती, कोरेगावमुळ, ऊरूळी कांचन (Uruli Kanchan) मुळगाव अमरोहा, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश Uttar Pradesh) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवि कानकाटे (Ravi Kankate) ऊर्फ रविंद्र मुरलीधर भोसले (Ravindra Murlidhar Bhosale) ऊर्फ जगदीश मुरलीधर भोसले (Jagdish Muralidhar Bhosale) व स्वप्नील कानकाटे Swapnil Kankate (दोघे रा. इनामदार वस्ती, गुरुदत्त नर्सरी शेजारी कोरेगाव ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सिंह मलिक यांनी मार्च 2021 पासून प्यूरिस्टिक न्युट्रिशियन (Puristic Nutritionist) नावाने उरुळी कांचन येथे सेंद्रिय उत्पादन व विक्रीचा (Organic production and sales) व्यवसाय चालू केला आहे. त्यांच्या ओळखीचे राजेंद्र खेडेकर (रा. इनामदारवस्ती, उरूळी कांचन) यांच्या इनामदार वस्ती येथील पंचकृषी नर्सरी (Panchakrishi Nursery) ठिकाणी ममता सिंग यांनी ऑफिस सुरु केले होते. त्याठिकाणी काम करत असताना रवि व स्वप्नील कानकाटे यांनी आयुर्वेदिक न्यूट्रीशियन बाबत चौकशी करून काही उत्पादने खरेदी करुन घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये येणे जाणे सुरु झाले होते. त्यादरम्यान त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबतचा सल्ला दिला व गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या डबल रक्कम मिळेल असे सांगितले. त्यावेळी स्वप्नील याने रवि हा माझा भाऊ असून त्यास तुम्ही पैसे द्या त्याची जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारे त्यांनी दोघांनी विश्वास संपादन केला. (Pune Crime)
त्यावेळी ममता सिंग यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून रवि कानकाटे यांच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी 25 जुलै ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत धनादेश, ऑनलाईन ट्रान्सफर, गुगल पे (Google Pay), एनईएफटी (NEFT), आरटीजीएस द्वारे (RTGS) बॅक खात्यावर व रोख स्वरुपात असे एकूण 1 कोटी रुपये दिले होते. सुरूवातीला एक महिन्यानंतर रवी कानकाटे याने त्यांना काही रक्कम परतावा म्हणून दिली होती. त्यानंतर त्यांचे गुंतवणुकीवरील परतावा (Returns On Investment) म्हणुन दोन कोटी पन्नास लाख रूपयाचा एचडीएफसी बॅकेचा (HDFC Bank) रवि भोसले या नावाचा धनादेश दिला. तो बँकेत भरला परंतू ते खाते बंद (Bank Account Close) असल्याचे त्यांना बॅकेकडुन समजले. तेव्हा त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाली. म्हणून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Rs 1 crore Fraud Cheating Case entrepreneur woman in lure of investment in stock market Crime against Ravi Kankate and Swapnil Kankate at Lonikalbhor police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR
- Mahashivratri 2022 | महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
- Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम
- Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता
Comments are closed.